Join us
Daily Top 2Weekly Top 5

सगळं फायनल झाल्यानंतर एरिका फर्नांडिसला स्टारकीडने केलं रिप्लेस; म्हणाली, 'नेपोटिझम आहेच!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:38 IST

एका बिग बजेट साऊथ सिनेमातूनही तिला एका स्टारकीडने रिप्लेस केल्याचा खुलासा तिने नुकताच केला.

टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने (Erica Fernandes) नुकताच तिचा टीव्ही ते सिनेमा आणि पुन्हा टीव्ही असा प्रवास सांगितला. यामध्ये एरिकानेही नेपोटिझमचा सामना केल्याचं ती सांगते. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेमुळे एरिका घराघरात पोहोचली. नंतर सिनेक्षेत्रात संधी शोधणाऱ्या एरिकाला अनेक अडचणी आल्या. नेपोटिझममुळे तिच्या हातातून अनेक संधी सुटल्या. एका बिग बजेट साऊथ सिनेमातूनही तिला एका स्टारकीडने रिप्लेस केल्याचा खुलासा तिने नुकताच केला.

Galatta India ला दिलेल्या मुलाखतत एरिका म्हणाली, " मी एका साऊथ सिनेमात काम करत होते. २-३ दिवस शूटिंगही केलं. यानंतर अचानक मला कोणीतरी रिप्लेस केल्याचं मीडियामधून कळलं. नंतर मला बॉलिवूडमध्ये का जात नाही असंही विचारण्यात आलं. पण तिथेही अनेकदा मी फायनल ऑडिशनपर्यंत गेले, जवळपास सगळं ठरलं असतानाच मला एका मोठ्या कलाकाराच्या मुलीने रिप्लेस केलं. इंडस्ट्रीत नेपोटिझम आहेच हे मला तेव्हा जाणवलं."

ती पुढे म्हणाली, " तरी मी हार मानली नाही. शेवटी पुढे काय हा प्रश्न असतोच. मी पुन्हा टीव्ही क्षेत्रात आले. तेव्हाही मला सिनेमात जायचं सोडून इकडे काय करते असं विचारलं गेलं. पण मला फरक पडत नाही कारण माझ्यासाठी काम हे काम आहे मग ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असो. मला त्याचा अभिमान आहे. म्हणूनच मी पुन्हा छोट्या पडद्यावर आले."

"मला अनेकदा बॉडी शेमिंग कमेंट्सचाही सामना कराला लागला आहे. याचा माझ्या करिअरवरही परिणाम झाला. सुरुवातीला मला अशा कमेंट्समुळे खूप वाईट वाटायचं. पण हळूहळू मी याचा स्वीकार करायला शिकले. मनातून तुम्ही कसे आहात हे जास्त महत्वाचं आहे." असंही ती म्हणाली

टॅग्स :एरिका फर्नांडिसटिव्ही कलाकारसिनेमाटेलिव्हिजन