Jui Gadkari : 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत सायलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनाराव राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.जुई गडकरीचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून म्हणून तिला ओळखलं जातं. जुई गेली अनेक वर्ष मालिकाविश्वात सक्रिय आहे. तसेच याचबरोबर ती जाहिरातींमध्ये काम करताना दिसते. मात्र, उत्तम करिअर सुरु असताना अनेकदा तिला गंभीर आजाराचा सामना करावा लागला आहे.त्यात अभिनेत्रीची यंदाची दिवाळीही आजारपणात गेली.
नुकतीच जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे तिने या दिवाळीत तिला टायफॉईड झालेला असं तिने म्हटलं आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत यंदाची दिवाळी तिच्यासाठी कशी होती हे सांगितलंय. ही पोस्ट पाहून अभिनेत्रीचे चाहते चिंतेत आहेत.
अभिनेत्रीला झालेला टायफॉईड...
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये जुईने 'या वर्षीची दिवाळी टायफॉइड रिटर्नवाली...survived' असं लिहिलं आहे. त्यातबरोबर दिवाळीत ती कुठे-कुठे गेली शिवाय काही खास क्षणांची माहितीही तिने दिली आहे.
जुई गडकरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'पुढचं पाऊल', 'वर्तुळ' तसंच 'सरस्वती'यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने काम केलं आहे.'पुढचं पाऊल' ही मालिका तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. सध्या ती 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
Web Summary : Actress Jui Gadkari, known for 'Tharla Tar Mag,' faced a tough Diwali battling typhoid. Despite the illness, she shared festive moments, sparking concern among fans. She has previously starred in shows like 'Pudhcha Paul'.
Web Summary : 'ठरला तर मग' के लिए जानी जाने वाली अभिनेत्री जूई गडकरी दिवाली पर टाइफाइड से जूझती रहीं। बीमारी के बावजूद, उन्होंने उत्सव के पलों को साझा किया, जिससे प्रशंसकों में चिंता फैल गई। उन्होंने पहले 'पुढचा पाउल' जैसे शो में अभिनय किया है।