Join us

दीपिका कक्करविरोधात डिझायनर मुलीची तक्रार, 'शो' मिळताच कामावरुन काढलं; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 09:35 IST

सानियाने युट्युब व्हिडिओ शेअर करत दीपिकावर हे आरोप लावले आहेत.

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड (Deepika Kakar) सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये दिसत आहे. लेकाच्या जन्मानंतर दीपिका हे पहिलंच काम करत आहे. दरम्यान दीपिकाच्या विरोधात एका फॅशन डिझायनर मुलीने आरोप लावले आहेत. दीपिकाने मुलीला सुरुवातीला कामावर ठेवलं मात्र शो मिळताच तिला कामावरुन काढून टाकलं. सानिया असं त्या मुलीचं नाव आहे जिला दीपिकाने दिल्लीहून मुंबईत आणलं. मात्र आता अचानक कामावरुन काढून टाकल्याने तिची पंचाईत झाली आहे. सानियाने युट्युब व्हिडिओ शेअर करत दीपिकावर हे आरोप लावले आहेत.

दीपिकाने २०२४ मध्ये क्लोदिंग ब्रँड लाँच केला होता. यासाठी तिने सानिया या दिल्लीच्या फॅशन डिझायनर मुलीला कामावर ठेवलं. तिला दीपिकाने आपल्या आईच्याच घरी राहायला जागा दिली. दीपिकाने सानियाला टीम बनवायला सांगितली. मात्र आता शो मिळताच दीपिकाने तिला थेट जायला सांगितलं. सानियाने युट्यूबवर अर्ध्या तासाचा व्हिडिओ अपलोड करत दीपिकाविरोधात आरोप केले आहेत. सुरुवातीला दीपिकाने सानियावरच आरोप लावले की सानिया काहीच काम करत नाहीए.  तिने टीमही बनवली नाही, कारागीरांनाही शोधलं नाही. सानियाने तिची माफी मागितली. दुसरी संधी देण्याची विनंती केली. मात्र नंतर दीपिकाने खुलासा केला की ती सानियाच्या चुकीमुळे तिला काढत नाहीए. तर आता तिला एक शो मिळाला आहे. तसंच ती सानियाला पगारही देऊ शकत नाहीए. म्हणून तिने सानियाला थेट जायला सांगितलं. सानियाने दीपिकासोबतचा चॅट स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

दीपिकाने २०१८ साली अभिनेता शोएब इब्राहिमसोबत लग्न केलं. हे तिचं दुसरं लग्न आहे. याआधी २०१५ साली दीपिकाचा घटस्फोट झाला होता. दीपिकाने २०२३ साली मुलाला जन्म दिला. त्याचं नाव रुहान असं ठेवण्यात आलं. रुहानच्या जन्मानंतर दीपिका पहिल्यांदाच कामावर परतली आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये ती झळकत आहे. तर दुसरीकडे सानियाने लावलेल्या आरोपांवर दीपिकाकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाटेलिव्हिजनट्रोल