टीव्ही अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) नुकतीच मुंबई सोडून बिकानेरला शिफ्ट झाली आहे. लेक जियानासह ती आता बिकानेरलाच राहणार आहे. तिथे चारु ऑनलाईन कपडे विक्री करत आहे. यावरुन चारु आर्थिक अडचणीत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर चारुचा पूर्व पती आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने (Rajeev Sen) 'सगळा ड्रामा आहे' अशी प्रतिक्रिया दिली होती. राजीवच्या या विधानावर चारु भडकली असून तिने त्याला सुनावलं आहे.
चारु असोपाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत राजीव सेनच्या विधानाचा स्क्रीनशॉट टाकला. यासोबत तिने लिहिले, "वाह किती छान, मी काहीही केलं तरी या माणसाला सगळा ड्रामाच वाटतो."
या पोस्टनंतर चारु युट्यूबवर व्हिडिओ शेअर करत म्हणते, "मला माझ्या लेकीकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणून मी फक्त मालिका करणार नाही बाती प्रोजेक्ट्स करेन. अशात मुंबईत उचाचंच लाखोंचं भाडं कशाला द्यायचं असं मला वाटलं म्हणून मी शिफ्ट झाले. आर्थिक अडचणींमुळे मी मुंबई सोडलेली नाही. मात्र मला मुंबईच्या घरासाठी तेवढं भाडं द्यायचं नव्हतं. मी बिकानेरला प्रॉपर्टी घेतली आहे पण त्यासाठी मी कर्ज काढलं आहे. जितकं मी मुंबईत भाडं देत होते तितकंच मी आता ईएमआय भरेन हेच मला योग्य वाटत. मी इथे घरीच राहून माझा ऑनलाईन बिझनेस करेन."
चारु असोपा आणि राजीव सेनचा २०२३ साली घटस्फोट झाला होता. त्यांचा ४ वर्षच संसार टिकला. त्यांना जियाना ही ५ वर्षांची मुलगी आहे. राजीवने गरोदरपणातच विश्वासघात केल्याचा चारुने आरोप केला होता. दोघांनी एकत्र येण्याचा बराच प्रयत्न केला मात्र नंतर ते कायमचे वेगळे झाले.