Join us

'बिग बॉस'च्या घरात पार पडलं पहिलं एलिमिनेशन; कोणाची एग्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:07 IST

'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे.

'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' ची सोशल मीडियावर सर्वत्र  चर्चा पहायला मिळत आहे. बिग बॉसचा खेळ रंजक होत चालल्याचं दिसतंय.   बिग बॉसच्या घरात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं असून एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं आहे. 

बिग बॉस या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण या घरात शेवटपर्यंत टिकून राहावं असं वाटतं. पण ते शक्य नसतं.  कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असतं. बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी शिवानी आणि निरज गोयत नॉमिनेट झाले होते.  'बिग बॉस ओटीटी ३' मधून एक्झिट घेणारा पहिला स्पर्धक नीरज गोयत ठरल्याचं समोर आलं आहे. 'बिग बॉस 17' शी संबंधित अपडेटे शेअर करणाऱ्या एका फॅन पेजने इव्हिकशनची माहिती दिली. तथापि, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

नीरज गोयतबद्दल बोलायचं झालं तर, तो  हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्याचा रहिवासी आहे. एक व्यावसायिक बॉक्सर असून एक चांगला प्रशिक्षक देखील आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बड्या स्टार्सना फाईट सिक्वेन्समध्ये मदत केली आहे. त्याने २००८ मध्ये सर्वात कुशल बॉक्सरचा किताब पटकावला आहे. त्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, नीरजने अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’ चित्रपटातून पदार्पण केले. 

बिग बॉसच्या घरातील नियमांनुसार प्रत्येक आठवड्याला एक सदस्य एलिमिनेट होऊन घराबाहेर जातो. त्यासाठी घरातील सदस्यांना नॉमिनेशनचा खेळ खेळावा लागतो. कधी-कधी मिड-वीक एलिमिनेशनदेखील होतं. बिग बॉसच्या या खेळात कोण वाचतं आणि कोण बुडतं हे तर येणाऱ्या भागात कळेलंच. घरात तग धरून राहण्यासाठी सगळेच मेहनत करताना दिसणार आहेत. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसामाजिकसोशल मीडियाअनिल कपूर