Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांची किल्ली! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं महागडं घर, चाहत्यांनी केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:18 IST

अभिनेत्रीने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून तिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले आहे. या नवीन घराचे खास फोटो पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय एक खास पोस्टही लिहिली आहे.

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी २' मुळे चर्चेत आलेली पलक पुरस्वानी (Palak Purswani) सध्या एका खास कारणामुळे आनंदात आहे. पलकचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून तिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले आहे. या नवीन घराचे खास फोटो पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय एक खास पोस्टही लिहिली आहे.

स्वप्नपूर्तीचा आनंद आणि गृहप्रवेश पलकने आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला. यावेळी पलक आणि पार्टनर रोहनच्या हातात घराची किल्ली दिसून येतेय. हे फोटो शेअर करुन पलक लिहिते, ''ज्या स्वप्नाबद्दल आम्ही फक्त बोलायचो, त्या घराचा दरवाजा अखेर उघडला आहे. स्वप्न पाहण्यापासून, त्याबद्दल सतत गप्पा मारण्यापासून ते आज प्रत्यक्ष हातामध्ये घराची चावी घेण्यापर्यंतचा हा प्रवास... हा क्षण आमच्यासाठी एका विजयासारखा आहे. पहिला फोटो सर्व काही सांगून जातोय– फक्त आम्ही दोघं, हातातील किल्ल्या आणि साकार होणारी आमची असंख्य स्वप्नं."

"हा आजचा पहिला दिवस आहे. अगदी कोरा, रिकामा आणि अनेक शक्यतांनी भरलेला. आमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी, सर्व सेलिब्रेशन आणि धावपळ सुरू होण्याआधी... आम्हाला आमच्या प्रवासाचा हा भाग तुमच्यासोबत शेअर करायचा होता. ही फक्त सुरुवात आहे, हा तो पाया आहे ज्यावर आम्ही प्रेमाने, आनंदाने आणि सुंदर आठवणींनी सजलेलं आमचं घर उभं करणार आहोत."

"मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेणं ही छोटी गोष्ट नाही... आणि जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी असतो, तेव्हा हे यश अधिकच खास ठरतं. आयुष्य जगण्यासाठी आणि हे सुंदर जग निर्माण करण्यासाठी मला तुझ्यापेक्षा उत्तम व्यक्ती मिळूच शकली नसती. रोहन, तू सोबत आहेस हे माझं भाग्य आहे, तू हे स्वप्न सत्यात उतरवलंस. तू खरोखरच माझा 'जीनी' (Genie) आहेस, ज्याने माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलंय."

"आम्ही या क्षणाची खूप मनापासून वाट पाहिली आहे... आणि आता जेव्हा तो क्षण आला आहे, तेव्हा तुम्हालाही त्यात सहभागी करून घ्यायला आम्हाला आवडेल. आमच्यासोबत हे स्वप्नातील घर उभं करण्यासाठी तुम्हीही सोबतीला राहा– मग ती भिंत असो, घराचा कोपरा असो वा प्रत्येक छोटी गोष्ट. आम्ही या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत, त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची, आशीर्वादाची आणि थोड्या नशिबाची साथ हवी आहे. एका नवीन सुरुवातीसाठी...''

English
हिंदी सारांश
Web Title : Palak Purswani of 'Bigg Boss' Fame Buys Dream Mumbai Home

Web Summary : Television actress Palak Purswani, known for 'Bigg Boss OTT 2', has achieved her dream of owning a home in Mumbai. She shared photos of her new house and expressed joy with her partner, Rohan, calling him her 'Genie' for fulfilling her dreams.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजनसुंदर गृहनियोजनटिव्ही कलाकार