Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली..." 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंतची एन्ट्री; नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:27 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. अवघ्या काही दिवसांवर या पर्वाचा फिनाले येऊन ठेपला आहे.  शिवाय १०० दिवसांचा हा कार्यक्रम ७० दिवसांतच संपतोय. त्यामुळे कुठेतरी चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. 'बिग बॉस'च्या घरात निक्की तांबोळीची पहिल्याच दिवसापासून चर्चा रंगली होती. या पर्वात 'बिग बॉस'च्या घरात निक्कीचा ठणाणा पाहता सर्वांनीच राखी सावंतला आणा अशी मागणी केली होती. अशातच  या आठवड्यात 'ड्रामा क्विन' राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री पाहून प्रेक्षक प्रचंड खुश  झाले आहेत.

सोशल मीडियावर कलर्सने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये   घरात राखी सावंत एन्ट्री करताना दिसते आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये घरात एन्ट्री करताच राखी म्हणते, "हॅलो बिग बॉस मी तुमची पहिली बायको! राखीला पाहून निक्की हाय रब्बा! अशी प्रतिक्रिया देते.

काय म्हणाले नेटकरी?

'बिग बॉस मराठी'च्या घरात राखी सावंतने प्रवेश करताच निक्कीला धक्का बसला. पण, 'बिग बॉस'च्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. घरामध्ये राखीला पाहताच त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळतंय. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, "चला शेवट तरी गोड होतोय. शेवटी शेवटी राखीला आणल्यावर राख तरी होणार नाही टीआरपीची". तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलंय , "राखी शिवाय बिग बॉस पूर्ण होऊच शकत नाही". आणखी एकाने म्हटलंय, " बिग बॉसने प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली".

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया