Join us

'परदेसी गर्ल' इरिना आणि वैभवने धनंजय पोवारच्या घरी चाखली झणझणीत मिसळ, हटके व्हिडीओ चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 13:51 IST

'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वासह त्यातील स्पर्धकांचीही तुफान चर्चा रंगली.

Irina Rudakova: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) यंदाच्या पर्वासह त्यातील स्पर्धकांचीही तुफान चर्चा रंगली. पण, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्पर्धकांमध्ये निर्माण झालेल्या नात्यांमध्ये बऱ्याचदा दुरावा निर्माण होतो. प्रत्येकजण आपल्या मार्गाला लागतो. परंतु बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक त्याला अपवाद ठरले आहेत. या कार्यक्रमात निर्माण झालेली नाती प्रत्येकजण जपताना दिसतोय. अलिकडेच 'कोकण हार्टेड गर्ल'ने कोल्हापूरला जाऊन धनंजय पोवारची भाऊबीजनिमित्त भेट घेतली. त्यापूर्वी वैभव चव्हाण आणि 'परदेसी गर्ल' इरिनाने (Irina Rudakova) धनंजयच्या घरी गेल्याचं पाहायला मिळाले.  तिथे गेल्यानंतर धनंजयने त्यांचा उत्तम पद्धतीने पाहूणचार केला होता. त्याचा व्हिडीओ इरिनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  

दरम्यान, सोशल मीडियावर इरिना रुडाकोवाने भाऊबीजनिमित्त लाडका भाऊ डीपीसाठी खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कोल्हापुरला गेली असताना धनंजयने इरिना-वेभव यांना मिसळ खाऊ घातली. त्यावेळी त्याने केलेला पाहूणचार पाहून इरिना भारावली. त्यावेळचे क्षण तिने कॅमेऱ्यात कैद केले. तो व्हिडीओ इरिनाने भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शेअर केला. 

या व्हिडीओच्या माध्यमातून तिने डीपीला भाऊबीजच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. "Happy Bhaubij Bhaaawwaaaa" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. इरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया