Join us

"नव्या सदस्याचं स्वागत..."; 'बिग बॉस मराठी' फेम निखिल दामलेची खास पोस्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 08:46 IST

अभिनेता निखिल दामलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Nikhil Damle: 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) यंदाचं पर्व चांगलच गाजलं. या शोमुळे अनेकजण प्रसिद्धीझोतात आले. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व संपून आता जवळपास महिना उलटला आहे. तरीही या शोमधील स्पर्धकांची कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा होताना दिसते. अनेकदा ते एकमेकांच्या भेटीगाठीही घेतात. अशातच या पर्वाच सहभागी झालेला स्पर्धक म्हणजेच अभिनेता निखिल दामले (Nikhil Damle) सध्या चर्चेत आला आहे. याचं कारणही तितकंच खास आहे. निखिलने नुकतीच नवीन गाडी खरेदी करून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर नवीकोरी गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "नवीन सदस्याचं स्वागत आहे" असं कॅप्शन देत निखिलने त्याची ड्रीम कार घेतल्याची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या कुटुंबीयांसह नव्या गाडीचं स्वागत करताना दिसत आहे. निखिल दामलेचा हा व्हिडीओ पाहून मराठी कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अभिजीत सावंत, सौरभ चौघुले तसेच समृद्धी केळकर, ऐश्वर्या शेटे आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम चेतना भटने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

निखिल दामले हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा. 'बिग बॉस'च्या घरात यायच्या आधी निखिल दामले 'रमा राघव' या मालिकेत काम करत होता. ही मालिका संपल्यावर निखिलने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केली. निखिल घरात सुरुवातीपासून शांतच होता. अखेरीस 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिसऱ्या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं. या डबल एविक्शनमधून निखिल दामलेला घराबाहेर जावं लागलं.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया