Join us

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखून दाखवा; 'बिग बॉस मराठी'च्या घरात केले होते प्रचंड राडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:13 IST

Marathi actress: सध्या 'बिग बॉस मराठी'फेम एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, तिचा हा फोटो पाहिल्यानंतर आज ग्लॅमरसतेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिच ती चिमुकली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

सध्याच्या काळात सोशल मीडियावर असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा जुने फोटो शेअर करणं, फॅमेली फोटो शेअर करणं वा तत्सम प्रकारचे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतात. विशेष म्हणजे सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील तितक्याच उत्साहाने हे ट्रेंड फॉलो करत असतात. यामध्येच सध्या 'बिग बॉस मराठी'फेम एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, तिचा हा फोटो पाहिल्यानंतर आज ग्लॅमरसतेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिच ती चिमुकली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांच्या कडेवर बसल्याचं दिसून येत आहे. सध्या तिचा हा फोटो चांगलाच चर्चेत येत आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शिवानी सुर्वे आहे. शिवानीने फादर्स डे निमित्त हा फोटो शेअर करत आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून तिचा हा फोटो चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात केले राडे

शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'देवयानी', 'नव्या', 'एक दिवाना था' अशा अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र, बिग बॉस मराठीमुळे ती विशेष चर्चेत आली. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोकठोक बोलण्याच्या शैलीमुळे या घरात तिने अनेकांसोबत वाद ओढावून घेतला.

टॅग्स :शिवानी सुर्वेटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबिग बॉस मराठी