'बिग बॉस मराठी ६' ची सध्या खूप चर्चा आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक हटके स्पर्धक सहभागी आहेत. अशातच काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये नॉमिनेशनची कुऱ्हाड हा टास्क झाला. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक कुऱ्हाड उचलून दोन किंवा तीन सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं. यावेळी अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरलेली दिसली. जेव्हा प्राजक्ता शुक्रे टास्क खेळायला आली, तेव्हा अनुश्री तिला काय म्हणाली? जाणून घ्याअनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरली'बिग बॉस मराठी ६' मध्ये नवीन नॉमिनेशन टास्कमध्ये गायिका प्राजक्ता शुक्रे सहभागी झाली. यावेळी प्राजक्ताने अनुश्रीचं नाव घेऊन तिच्यावर कुऱ्हाड मारली. ''घर एकीकडे असतं आणि हिला दुसरीकडे जावं असं वाटत असतं'', अशा शब्दांत प्राजक्ताने अनुश्रीला नॉमिनेट केलं. हे ऐकताच अनुश्री म्हणाली, ''काय नल्ले स्पर्धक आणलेत तुम्ही बिग बॉस. यांना गेम पण कळत नाहीये.'' हे बोलताच प्राजक्ताने अनुश्रीच्या भाषेवर बोट ठेवलं.''तुझी ही भाषाच मला आवडत नाही'', असं प्राजक्ता तिला म्हणाली. हे ऐकताच अनुश्री पुढे म्हणाली, ''हा बरोबर आहे. कारण प्रवाहासोबत जाणारी मी नाहीये. मला नेहमी उलट्या दिशेलाच जायला आवडतं.'', अशाप्रकारे नॉमिनेशन टास्कमध्ये प्राजक्ताशी बोलताना अनुश्रीची जीभ घसरलेली दिसली. आता यावरुन रितेश देशमुख या आठवड्याच्या भाऊचा धक्कामध्ये अनुश्रीला फटकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Web Summary : In 'Big Boss Marathi 6', Anushree Mane's remark about fellow contestants being unskilled ignited a feud with Prajakta Shukre during the nomination task. Prajakta criticized Anushree's language, leading to a heated exchange and raising questions about potential repercussions.
Web Summary : बिग बॉस मराठी 6' में, अनुश्री माने की साथी प्रतियोगियों को अकुशल बताने वाली टिप्पणी ने नामांकन कार्य के दौरान प्राजक्ता शुक्रे के साथ विवाद को जन्म दिया। प्राजक्ता ने अनुश्री की भाषा की आलोचना की, जिससे तीखी बहस हुई और संभावित नतीजों पर सवाल उठे।