Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत सावंतचं प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; नवं कोरं गाणं लवकरच येणार भेटीला, VIDEO आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:14 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Abhijeet Sawant New Song: इंडियन आयडल विनर, गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. आपल्या दमदार खेळीने त्याने फिनालेपर्यंत तो टिकून राहिला. या पर्वात  अभिजीतने संयमी आणि शांत स्वभावामुळे प्रेक्षकांची मन जिंकली. 'बिग बॉस'मराठीचा शोनंतरही अभिजीतला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. अशातच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

अभिजीत सावंत 'बिग बॉस'मधून बाहेर येताच त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्यामुळे अभिजीतबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना उत्सुक असतात. दरम्यान, अभिजीत दिवाळीच्या निमित्ताने भावा-बहीणीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी नवं कोरं गाणं घेऊन येत आहे. 'Saregama Marathi च्या 'लाडकी बहीण' या गाण्यासाठी त्याने आपला आवाज दिला आहे.

नुकताच सोशल मीडियावर अभिजीत सावंतच्या 'लाडकी बहीण' या गाण्याचा टीझर समोर आला आहे. 'साऱ्या जगातली लाडकी माझी तू...' असे या गाण्याचे बोल आहेत. 'सारेगमप मराठी'ने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिजीतच्या सुमधुर गायनाची स्तुती केल्याचं पाहायला मिळतंय. 

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया