Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्लला दाखवला होता अ‍ॅटिट्यूड, अंकिता म्हणाली- "त्यानंतर मी त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:55 IST

बिग बॉसच्या घरात जायच्या आधी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीतून तिच्या मुंबईच्या आणि करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. या मुलाखतीत अंकिताने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. 

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सहभागी झाली. बिग बॉसच्या घरात अंकिताने एन्ट्री घेताच चाहत्यांना सुखद धक्का मिळाला. पहिल्या दिवसापासूनच अंकिताने घरात तिचं स्थान निश्चित करण्यास सुरुवात केली होती. अंकिता ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. कोकणात वाढल्याने अंकिताने मुंबईतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. बिग बॉसच्या घरात जायच्या आधी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीतून तिच्या मुंबईच्या आणि करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. या मुलाखतीत अंकिताने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. 

बिग बॉस मराठीचं घर गाजवणारी अंकिता लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अंकिताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. इन्फ्लुएन्सर असलेली अंकिता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. पण, एका कार्यक्रमात अंकिताला तिच्या आवडत्या अभिनेत्याकडूनच वाईट वागणूक मिळाली होती. याचा अनुभव तिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. अंकिता म्हणाली, "एक अभिनेता मला खूप आवडायचा. पण, जेव्हा मी इन्फ्लुएन्सर झाले आणि एका इव्हेंटच्या निमित्ताने त्याला भेटण्याचा योग आला. तेव्हा त्याने मला अॅटिट्यूड दिला. त्यानंतर मग मी त्याला अनफॉलो करून टाकलं. ते खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत". 

दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच अंकिताला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळत आहे. बिग बॉस मराठी ५चा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण यापैकी कोण ट्रॉफी उचलणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकार