Join us

'तो फक्त खेळातील जोकर'; चाहत्याच्या चुगलीमुळे जय-विशालच्या मैत्रीत फूट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 18:01 IST

Bigg boss marathi 3: घरात प्रवेश केल्यानंतर एकमेकांचे चांगले मित्र झालेल्या अनेकांमध्ये वादाची फूट पडताना दिसत आहे. यामध्येच आता जय आणि विशालच्या मैत्रीत फूट पडणार असल्याचं दिसून येत आहे.

ठळक मुद्देबिग बॉसची चावडीमध्ये विशालचा एक चाहता त्याला जयची चुगली सांगणार आहे.

'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व पहिल्या भागापासूनच चर्चेत आलं आहे. हे पर्व सुरु होऊन अवघा एक आठवडा झाला असून आता हा शो चांगलाच रंगात आला आहे. घरात प्रवेश केल्यानंतर एकमेकांचे चांगले मित्र झालेल्या अनेकांमध्ये वादाची फूट पडताना दिसत आहे. यामध्येच आता जय आणि विशालच्या मैत्रीत फूट पडणार असल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसची चावडीमध्ये विशालचा एक चाहता त्याला जयची चुगली सांगणार आहे. ज्यामुळे जयचं खरं रूप विशालसमोर येणार आहे.

शनिवारी झालेल्या बिग बॉसची चावडी या भागात महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली होती. त्यानंतर रविवारच्या ( २६ सप्टेंबर) भागात स्पर्धकांचे चाहते त्यांना घरातील सदस्यांच्या चुगल्या सांगणार आहेत. ज्यामुळे या स्पर्धकांना पुढे खेळात कोणत्या सदस्यापासून सावधपणे खेळावं याचा अंदाज येईल.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विशालला त्याच्या चाहत्याने जय-उत्कर्षची चुगली लावली आहे. माझ्या एका चाहत्याने सांगितलंय की, विशाल हा गेममधला जोकर आहे, असं जयने उत्कर्षला सांगितलं. पण, जय.. हा विशाल जोकर आहे की किंग हे तुला वेळ आल्यावरच समजेल, असं या व्हिडीओमध्ये विशाल म्हणाला आहे.

दरम्यान, 'बिग बॉस'च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी घरातील प्रत्येक सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. यात मीराला त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. तर, आजच्या भागात शिवलिला आणि तृप्ती देसाई यांच्यात वाद होताना दिसणार आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारयुद्धमहेश मांजरेकर