Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:46 IST

अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्‍पा मारणार आहेत.

ठळक मुद्देएसआरकेसारखा माणूस नाही, मी त्‍यांची तिथेच फॅन झाले. एसआरके सारखा माणूस जर वैशाली माडेसोबत तास भर गप्‍पा मारू शकतो तर त्‍याचासारखा डाऊन टू अर्थ माणूस नाही!

बॉलिवुडचा किंग खान म्‍हणून लोकप्रिय असलेल्‍या शाहरूख खानचे जगभरात अनेक चाहते आहेत. तो त्‍याला भेटणाऱ्या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला आकर्षून घेतो आणि असेच काहीतरी घडले बिग बॉस घरातील स्‍पर्धक वैशाली माडेच्‍या बाबतीत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत गप्‍पा मारताना दिसत आहेत. 

अभिजीत बिचुकले वैशालीला तिच्‍या सुपरस्‍टारसोबतच्‍या भेटीबाबत विचारतो. वैशाली सांगते, ''बच्‍चन साहेबांना बहुतेक मी भेटले आहे पण आठवत नाही कुठे ते. शाहरूख खान यांना मी एका फिल्‍मच्‍या प्रमोशनल इव्‍हेण्‍टला भेटले आहे.'' त्यावर बिचुकले उत्‍सुक होऊन तिला शाहरूख खानसोबत तुमचे काही बोलणे झाले आहे का असे विचारले? त्यावर वैशाली अभिमानाने सांगते, ''एसआरकेसोबत मी तासभर गप्‍पा मारल्‍या आहेत! एसआरकेसारखा माणूस नाही, मी त्‍यांची तिथेच फॅन झाले. एसआरके सारखा माणूस जर वैशाली माडेसोबत तास भर गप्‍पा मारू शकतो तर त्‍याचासारखा डाऊन टू अर्थ माणूस नाही! किती ग्रेटनेस असेल त्‍यांचा की ते स्‍वत:हून समोरून माझ्याशी बोलायला आले. तेव्‍हापासून मी एसआरकेची फॅन आहे. मला बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये फक्‍त एसआरके आवडतो.'' 

शाहरुख डाऊन टू अर्थ आहे ही वैशालीने सांगितलेली गोष्ट बिचुकलेने देखील मान्य केली. तो म्हणाला की, एसआरके हा महान आहे, आज ज्‍या ठिकाणी आहे तेथे पाहोचण्‍यासाठी त्‍याला भरपूर संघर्ष करावा लागला. तो पुढे म्‍हणतो, '' आज शाहरुख मोठा स्टार आहे तर काही वर्षांपूर्वी हे स्टारडम राजेश खन्ना यांना मिळाले होते. त्‍या काळामध्‍ये राजेश खन्‍ना इतके प्रसिद्ध अभिनेते होते की त्‍यांच्‍या लेडी फॅन्‍सनी आपल्‍या मुलांचं नाव 'राजेश' असे ठेवले होते!'' याबाबतीत किशोरी सांगते, ''तो काळच तसा होता की, अभिनेत्याच्या नावाने सगळे प्रेरित व्‍हायचे आणि आपला मुलगा पण असा मोठा अभिनेता बनणार म्‍हणून त्‍याचंच नाव मुलाला ठेवायचे.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीवैशाली माडेअभिजीत बिचुकलेकिशोरी शहाणे