Join us

वीणा जगतापची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री; 'रमा राघव' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:45 IST

Veena jagtap: नुकतीच या मालिकेत विक्रम या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर आणखी एक नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वीणा जगताप (veena jagtap) हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. अनेक गाजलेल्या मालिका, बिग बॉस मराठी सारखा रिअॅलिटी शो यांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बिग बॉस मराठीनंतर वीणाचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तिने दमदार पदार्पण केलं आहे. लवकरच ती रमा राघव या मालिकेत झळकणार आहे.

रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा-राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवासच त्यांच्या आयुष्यात नवं वादळ आणणार आहे. नुकतीच या मालिकेत विक्रम या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर आणखी एक नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्याचसोबत आता  या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात  प्रेक्षकांसमोर येत आहे. रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. अद्वैत दादरकर पाठोपाठ या मालिकेत वीणाची एन्ट्री होणार आहे.

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी वीणा या नव्या मालिकेत नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, अद्यापतरी तिची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. केवळ तिची या मालिकेत एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनवीणा जगतापबिग बॉस मराठीटिव्ही कलाकार