टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस १८' ची गाजलेली स्पर्धक चाहत पांडे (Chahat Pandey) सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. 'बिग बॉस'नंतर ती 'द ५०' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली आणि आता तिने चाहत्यांना एक खूप मोठी 'गुड न्यूज' दिली आहे. चाहतने मुंबईत तिचे दुसरे आलिशान घर खरेदी केले आहे. त्यामुळे सर्वांनी चाहतचं अभिनंदन केलंय. अवघ्या २६ व्या वर्षी मुंबईसारख्या ठिकाणी चाहतची आता दोन घरं आहेत.
दुसऱ्या घराची पहिली झलक चाहतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नवीन घराचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या नवीन फ्लॅटमधून मुंबईचा आणि समुद्राचा अत्यंत सुंदर नजारा दिसतो. नवीन घरात प्रवेश करतानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. घराच्या बाल्कनीत उभं राहून चाहतने खास फोटो काढले. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिने मुंबईत स्वतःचा पहिला फ्लॅट घेतला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच तिने आता दुसरा फ्लॅट खरेदी केला आहे. या घराची किंमत कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे
मध्य प्रदेशातील दमोह (बुंदेलखंड) या तिच्या मूळ गावी तिने अत्यंत आलिशान आणि मोठी कोठी बांधली आहे. त्याच्या गृहप्रवेशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अवघ्या कमी वयात चाहतने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुक केली आहे. तिने आपल्या जुन्या घराचे रिनोव्हेशन करण्यासोबतच काही दुकानांमध्ये गुंतवणूक केल्याचीही चर्चा आहे.
'पवित्र बंधन', 'नथ जेवर या जंजीर' आणि 'हमारी बहू सिल्क' यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेली चाहत आज टीव्ही सृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. कमी वयात स्वतःच्या कष्टाने मुंबईसारख्या शहरात दोन घरे घेणाऱ्या चाहतवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
Web Summary : Actress Chahat Pandey, 26, bought a second luxurious Mumbai home. After 'Bigg Boss 18' and 'The 50,' she shared photos of her new flat with sea views on Instagram. She also owns property in her hometown.
Web Summary : अभिनेत्री चाहत पांडे, 26, ने मुंबई में दूसरा आलीशान घर खरीदा। 'बिग बॉस 18' और 'द 50' के बाद, उन्होंने इंस्टाग्राम पर समुद्र के दृश्यों के साथ अपने नए फ्लैट की तस्वीरें साझा कीं। उनका अपने गृहनगर में भी संपत्ति है।