Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:53 IST

'बिग बॉस १९'मध्ये या आठवड्यात पहिलं एलिमिनेशन रंगणार आहे. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' च्या घरात या आठवड्यात सीझनमधील दुसरा वीकेंड का वार रंगणार आहे. पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस १९' मधील कोणीही स्पर्धक बाहेर गेलं नव्हतं. परंतु या आठवड्यात मात्र नॉमिनेशनमध्ये असलेल्या एका स्पर्धकाला बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसणार आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.

कोण जाणार 'बिग बॉस १९'मधून बाहेर?

 'बिग बॉस १९' शोच्या पहिल्या एलिमिनेशनमध्येच एक स्पर्धक घराबाहेर झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. या आठवड्यात तान्या मित्तल, अवेज दरबार, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक हे स्पर्धक नॉमिनेटेड होते. शोच्या दुसऱ्या आठवड्यातच स्पर्धकांमध्ये वाद आणि मैत्री दिसून आली. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्कमध्ये एकमेकांविरुद्ध लढताना पाहिले. या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनमध्ये नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. सलमान खानच्या उपस्थितीत हा स्पर्धक 'बिग बॉस १९'च्या घराबाहेर गेला, अशी चर्चा आहे.

कोण गेलं घराबाहेर?

मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवेज दरबारला बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट व्हावं लागलं आहे. अवेज दरबार हा प्रसिद्ध युट्यूबर आणि कोरिओग्राफर आहे.  त्याच्यासोबत तान्या मित्तल, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक हे देखील डेंजर झोनमध्ये होते. पण अवेजला सर्वात कमी मते मिळाल्यामुळे त्याला घराबाहेर जावे लागले. अवेज दरबारच्या एलिमिनेशनमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत, तर घरातून बाहेर पडताना त्याने भावनिक प्रतिक्रियाही दिली. अर्थात याविषयी अधिकृत माहिती आज किंवा उद्या 'बिग बॉस १९'च्या एपिसोडमध्येच कळून येईल. दरम्यान मराठमोळा स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे 'बिग बॉस १९' गाजवत आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड