Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली हो! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा; लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:55 IST

भारती सिंगनंतर आणखी एका कलाकाराच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता बाबा झाला आहे

मनोरंजन विश्वातूल एक गुड न्यूज समोर आली आहे. नुकतंच अभिनेत्री भारती सिंग आई झाल्याची बातमी सर्वांच्या समोर आली. याशिवाय आणखी एक कलाकार बाबा झाल्याची बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस १२' मधून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध भोजपुरी गायक दीपक ठाकूर बाबा झाला आहे. दीपक आणि त्याची पत्नी नेहा चौबे यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी खुद्द दीपकने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

दीपक ठाकूरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या गोड बातमीची घोषणा केली. आपल्या मुलीचे स्वागत करताना त्याने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. याशिवाय चिमुकल्या लेकीचा एक गोड फोटोही शेअर केला आहे. दीपकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली असून ईश्वराच्या आशीर्वादाने आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे."

ही बातमी समोर येताच दीपकच्या चाहत्यांनी आणि 'बिग बॉस'मधील त्याच्या सह-कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. अनेकांनी "छोट्या परीचे स्वागत" आणि "दीपक आणि नेहाचे अभिनंदन" अशा कमेंट्स केल्या आहेत. आपल्या साध्या आणि दिलखुलास स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या दीपकने कुटुंबासोबत हा आनंदाचा क्षण साजरा केला आहे.

दीपक ठाकूर आणि नेहा चौबे यांचा विवाह २४ नोव्हेंबर २०२४ रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नाच्या एक वर्षातच आता या जोडप्याच्या आयुष्यात या छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. दीपक ठाकूरने 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या चित्रपटांमधून आपल्या गायकीची छाप सोडली आहे. त्यानंतर सलमान खानच्या 'बिग बॉस १२' या रिअॅलिटी शोमुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तो सेकंड रनरअप ठरला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Bigg Boss' Fame Deepak Thakur Becomes Father to a Baby Girl!

Web Summary : Deepak Thakur, famed from 'Bigg Boss 12,' and his wife, Neha, are now parents! They welcomed a baby girl, sharing the joyful news and a photo on social media. Congratulations are pouring in for the couple who married in November 2024.
टॅग्स :दीपक ठाकुरबिग बॉस १९बिग बॉस 12टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड