Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भारत गणेशपुरेंची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 13:03 IST

भारत गणेशपुरे कुठे आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' ने गेल्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. १० वर्ष या शोने सर्वांना खळखळून हसवलं. सूत्रसंचालक डॉ निलेश साबळे हसताय ना? हसायलाच पाहिजे या डायलॉगने सुरुवात करायचे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे अशी सर्वच मंडळी लोकप्रिय झाली. आता सगळेच इकडे तिकडे काही ना काही काम करत आहेत. कुशल बद्रिकेने हिंदी कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. तर भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) कुठे आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची झी मराठीच्याच लोकप्रिय 'शिवा' या नव्या मालिकेत एन्ट्री झाली आहे. नुकताच त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमोही समोर आला. या मालिकेत ते एकदम डॅशिंग अंदाजात दिसत आहेत. 'शिवा' ही मालिका गेल्या महिन्यातच सुरु झाली आहे. शाल्व किंजवडेकर आशुतोषच्या भूमिकेत आहे आणि पूर्वा गोखले शिवा ही मुख्य भूमिका साकारत आहे. नवीन प्रोमोनुसार, दोघंही एक प्लॅन आखतात आणि इनकम टॅक्स अधिकाऱ्यांचा लूक करतात. एका घरात ते धाड टाकतात. ते घर कोणाचं असतं तर भारत गणेशपुरे यांचं. त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारत गणेशपुरे यांना पुन्हा मालिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांची या मालिकेत नकारात्मक भूमिका असणार आहे. शिवा ज्या भागात राहते असते तिथले ते नगरसेवक आहेत. शिवा आणि आशुतोष मिळून यांच्याच घरावर धाड टाकतात असं दाखवण्यात आलं आहे. आता भारत गणेशपुरे यांची भूमिका नक्की किती काळ दाखवणार हे स्पष्ट नाही. मात्र अनेक दिवसांनी त्यांना अँग्री लूक मध्ये पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :भारत गणेशपुरेटिव्ही कलाकारचला हवा येऊ द्याटेलिव्हिजनमराठी अभिनेता