Join us
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेबही आज खूष असतील,” निकालानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 23:48 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर यानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत अभिनंदन केलं आहे. तसंच “बाळासाहेब पण खूष असतील आज..,” असं ट्वीट आरोह वेलणकरनं केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?“आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. 

“त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्रशिवसेनाआरोह वेलणकर