Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:30 IST

Sairaj kendre: साईराज सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात.

सध्या सोशल मीडियावर पुष्पा 2 या सिनेमातील सामी सामी हे गाणं तुफान व्हायरल होतंय. या गाण्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांची एक डान्स स्टेप प्रचंड व्हायरल झाली असून अनेकांनी ती स्टेप फॉलो केली आहे. यात अनेक कलाकारांनीही या गाण्यावर रील केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याची क्रेझ आता बालकलाकारांमध्ये ही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील सिंबाने सुद्धा या गाण्यावर भन्नाट रील शेअर केली आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्र याने सिंबा म्हणजेच अमोलची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्याने केलेल्या अभिनयामुळे सगळेच जण त्याचे चाहते झाले आहेत.त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग दिसून येतो. यामध्येच त्याचा सामीवरील व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

साईराजने अल्लू अर्जुनच्या सामी सामी या गाण्यावर डान्स केला असून या गाण्यातील हूक स्टेपही फॉलो केली आहे. त्यामुळे या चिमुकल्यापुढे आता अल्लू अर्जुनही फेल गेल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअल्लू अर्जुनपुष्पा