Join us

लग्नाला एक वर्षही पूर्ण नाही, अभिनेत्रीचं अफेअर, रंगेहाथ पकडल्याचा पतीचा दावा; घटस्फोट घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:45 IST

लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ

अभिनेत्री या कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात. कधी त्यांच्या लग्नामुळे तर कधी अफेअर्समुळे. अशीच एक अभिनेत्री आहे, जी लग्नानंतर ९ महिन्यांतच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. पतीने अभिनेत्रीवर अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, घटस्फोटासाठी तिने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा दावाही पतीने केला आहे. तसेच हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावेही असल्याचंही अभिनेत्रीच्या पतीने म्हटले आहे.

या अभिनेत्रीचं नाव आहे अदिती शर्मा. ती टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  'ये जादू है जिन्न का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अदितीनं डिझायनर अभिनीत कौशिकसोबत लग्न केलं होतं. अदिती आणि अभिनीत यांच्या लग्नाला अवघे ९ महिने झाले आहेत. पण, आता हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबद्दल अभिनीतने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. लग्नानंतर ४ महिने अदितीने तिचे लग्न लपवून ठेवले होते आणि त्यानंतर लगेचच तिने घटस्फोटाची मागणी करायला सुरुवात केली, असा आरोप अभिनीतने केला आहे.

अभिनीतने अदितीवर तिच्या सह-अभिनेत्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभिनीतच्या म्हणण्यानुसार, अदितीचे तिच्या मालिकेतील सह-अभिनेता सामर्थ्य गुप्तासोबत अफेअर आहे.  या दोघांना 'रंगेहाथ' पकडल्याचा दावाही अभिनीतने केला आहे. रंगेहाथ पकडल्यानंतर अदितीने हे लग्न वैध नसल्याचे सांगत घटस्फोटाची मागणी केली. इतकेच नव्हे, तर तिने अभिनीतकडून २५ लाख रुपयांची पोटगी (Alimony) मागितली असल्याचा आरोपही त्याने केला आहे. आदित शर्मा आणि समर्थ गुप्ता यांनी 'अपोलिना' या शोमध्ये एकत्र काम केले होते. सध्या समर्थ 'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' मध्ये दिसत आहेत. 

अभिनीत म्हणाला की, "तो लग्नासाठी तयार नव्हता, परंतु आदितीनेच त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला होता. ती गेल्या दीड वर्षांपासून माझ्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि मी तिला सांगत राहिलो की मी अजून लग्नासाठी तयार नाही. तिने माझ्यावर दबाव आणल्यानंतर मी होकार दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये आमचे लग्न झाले. तिची एक अट होती की तिच्या करिअरमुळे बाहेर कोणालाही कळू नये. आम्ही आमच्या घरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्न सर्व विधींसह पार पडले. माझ्याकडे आमच्या लग्नाचे, फेऱ्यांचे आणि सर्व गोष्टींचे हजारो फोटो आहेत. अदितीचे सहकलाकारासोबत प्रेमसंबंध सुरू झाले, तेव्हा लग्नात अडचणी सुरू झाल्या. तेव्हापासून ती घटस्फोटाबद्दल बोलू लागली". दरम्यान, अदिती या आरोपांवर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनघटस्फोटलग्न