'बिग बॉस हिंदी', 'बिग बॉस मराठी', 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' यांसारखे लोकप्रिय शो गाजवणारी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे निक्की तांबोळी. निक्की (nikki tamboli) कायमच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाहीरपणे सांगत आली आहे. अशातच निक्कीने एका मुलाखतीत ती काही दिवसांपूर्वी ICU मध्ये दाखल असल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. काय म्हणाली निक्की? जाणून घ्या
निक्की तांबोळी ICU मध्ये होती कारण..
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत निक्कीने खुलासा केला की, "ही गोष्ट कोणाला माहिती नाही. मी याविषयी सोशल मीडियावरही काही पोस्ट केलं नाही. ४ दिवसांपूर्वी मी ICU मध्ये अॅडमिट होते. मी एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवायला गेले होते. शेलफिश खाऊन एलर्जी होईल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी त्यादिवशी ४ मोठे प्रॉन्स (कोळंबी) खाल्ले. त्यामुळे माझ्या शरीरावर मोठा परिणाम झाला. माझी फुफ्फुस काम करायचं बंद झालं. माझे डोळे सुजून ते मोठे झाले. चेहऱ्यावर फेस आला आणि संपूर्ण अंगावर खाज येत होती. चेहरा प्रचंड सुजला आणि मोठा झाला. शरीराच्या आतील ऑर्गन्स सुजल्यामुळे एकमेकांसोबत चिकटले आणि माझा श्वास जवळपास थांबला होता."