Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी ४'ला वर्षपुर्ती होताच अभिनेता अक्षय केळकरची खास पोस्ट, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:26 IST

अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे.  

अभिनेता अक्षय केळकर  वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. अक्षय सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तो विविध पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतेच त्याने एक पोस्ट शेअर केली असून सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरून त्याला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने अक्षयने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे. 

अक्षयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हा बिग बॉसच्या घरात असून आपल्या प्रवासावर बोलताना दिसत आहे.  तर कॅप्शमध्ये त्याने लिहलं, 'माझ्या आयुष्यातील एका मोठ्या दिवसाला एक वर्ष पुर्ण. आयुष्यातला एक क...मा...ल.. क्षण म्हणजे, बिग बॉसने माझ्या घरातल्या प्रवासाचं, खिलाडू वृत्तीचं केलेलं कौतुक! आणि एका सुंदर क्षणांनी भरलेल्या प्रवासातला विजयाचा तो शेवटचा दिवस'.

पुढे त्याने लिहलं, 'त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय! (हे खूप फिल्मी वाटू शकतं, पण एक वर्ष झालंय खरंच वाटत नाही. अजूनही घरात असल्या सारखंच वाटतंय.) मायबाप रसिकांचे मनापासून आभार. हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झाला. सर्वांचे खूप खूप आभार. Bigg Boss आणि मायबाप प्रेक्षक, I love You, मी खरंच फक्त आणि फक्त तुमचाच आहे'. अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे.  अत्यंत हुशारी आणि शिताफीने त्याने आपले डाव टाकत हा खेळ पूर्ण केला आणि विजयी झाला.  अखेर आपल्या शांत स्वभावाच्या आणि युक्तीच्या जोरावर त्याने ही जेतेपद मिळवले. अक्षयला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. तसेच तो या पर्वाचा 'कॅप्टन ऑफ द सिझन' ठरला आहे. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबिग बॉस मराठी