स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहवरील मालिकांमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. स्टार प्रवाहवरील काही मालिका आदेश बांदेकर- सुचित्रा बांदेकर यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. आदेश-सुचित्रा यांची सून पूजा बिरारीही अभिनेत्री आहे. आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.अभिजीत खांडकेकर आणि अनुष्का सरकटे हे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी अभिजीत खांडकेकर पूजाला उद्देशून म्हणाला, ''आता तर काय बोलायची सोयच नाही, अगं तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत ना. त्यामुळे जरा काही बोललं, एक 'आदेश' आला तर माझ्या चेहऱ्याचं 'सुचित्र' बिघडेल, आणि मग मी जातोय हिमालयात 'सोहम mmm 'म्हणत.'' अभिजीत हे बोलत असताना पूजाची हसून हसून पुरेवाट झाली. ''अरे काय बोलतोय?'', असे हातवारे करुन पूजाची बोलतीच बंद झाली.
Web Summary : At Star Pravah Awards 2026, host Abhijit Khandkekar playfully teased Pooja Birari about her producer in-laws, the Bandekars. Pooja, married to Soham Bandekar, was speechless with laughter at the joke. The event celebrated Star Pravah's talent, highlighting Pooja and Soham's grand wedding in December 2025.
Web Summary : स्टार प्रवाह अवॉर्ड्स 2026 में, होस्ट अभिजीत खांडकेकर ने पूजा बिरारी को उनके प्रोड्यूसर सास-ससुर बांदेकर के बारे में मज़ाकिया अंदाज़ में छेड़ा। सोहम बांदेकर से विवाहित पूजा, इस मजाक पर हंसी से चुप हो गईं। कार्यक्रम में स्टार प्रवाह की प्रतिभा का जश्न मनाया गया, जिसमें पूजा और सोहम की दिसंबर 2025 में हुई भव्य शादी पर प्रकाश डाला गया।