Join us

Gauri Kulkarni : "लग्नासाठी तयार पण..." आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:49 IST

मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत.

मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमध्ये नुकतेच कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बांधली, तर मराठीत हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्नबंधनात अडकली आहे. आता आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिची पोस्ट चर्चेत आहे. 

आपल्या गोड दिसण्याने चाहत्यांना भूरळ पाडणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये गौरीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. केसात गुलाबाची फूलं लावली आहेत तर साजेसा श्रृंगार केला आहे.तिच्या या पोस्टवर चाहते फिदा झाले आहेत. गौरीने पोस्टखाली इंग्रजीत कॅप्शनही लिहिले आहे. ती म्हणते, 'मी लग्नासाठी तयार आहे पण...दुसऱ्याच्या.'

गौरीच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहते कमेंट करत आहेत. गौरी देखील लवकरच बोहल्यावर चढते की काय असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र गौरीने सध्या करिअरवर लक्ष द्यायचं ठरवलंय. गौरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती पोस्ट करत असते जे चाहत्यांच्या पसंतीस पडतात. तसेच आई कुठे काय करते मालिकेतील तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. गौरीचे इन्स्टाग्रामवर २ लाख फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेताटिव्ही कलाकारलग्नसोशल मीडिया