Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी महांगडेने केला तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश; वास्तुशांतीचा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:09 IST

Ashvini mahangade: अश्विनीने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. काही दिवसांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने मुंबईत नवीन घर खरेदी केल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे याच नव्या घरात आता तिने गृहप्रवेश केला आहे. 

अश्विनीने सोशल मीडियावर तिच्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या नवीन घरात वास्तूशांतीची पूजा सुरु असल्याचं दिसून येत आहे. या पुजेला अश्विनीचे दादा-वहिनी बसल्याचं पाहायला मिळत आहे. आमच्या सगळ्यांचे घर..माझ्या माणसांमुळे घराला घरपण आहे, असं कॅप्शन देत अश्विनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, अश्विनीच्या नव्या घराचा व्हिडीओ पाहिल्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिकासुंदर गृहनियोजन