Join us

"'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?" पहलगाम हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:37 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे (pahalgam, tejaswini pandit)

काल देशाला हादरवणारी मोठी घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पहलगाम (pahalgam attack) येथे पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. त्यामुळे या घटनेबद्दल सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (tejaswini pandit) या हल्लाविरोधात सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली. 

तेजस्विनी पंडीतने व्यक्त केला संताप

तेजस्विनीने x वर पोस्ट करुन लिहिलंय की, "अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत…. दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते ? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का ? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत ? अश्या घटना घडतात तेंव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्स वर विश्वास कसा ठेवायचा ? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही ?"

“त्या हरामखोरांकडून” सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण ? इतक्या हल्ल्यांनंतरही “त्यांच्या” घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण ? निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण ? असे अनेक प्रश्न…… तुम्हालाही हे भेडसावतात ? काळी रात्र , सुन्न मन!" अशा शब्दात तेजस्विनीने तिचा संताप व्यक्त केलाय.  पहलगाममधील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरूष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या. यात आपापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लातेजस्विनी पंडितमराठी अभिनेतामराठी चित्रपटदहशतवाददहशतवादीदहशतवादी हल्ला