Join us

कियाराच नाही आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीची 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, यशसोबत करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 18:33 IST

सध्या सोशल मीडियावर यशच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.

साऊथ सुपरस्टार यश (Yash Gowda) आगामी 'टॉक्सिक' (Toxic)  सिनेमात दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर यशच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 'केजीएफ' सिनेमानंतर यशच्या या सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यशने शूटला सुरुवातही केली आहे. दरम्यान यश नुकताच अंबानींच्या लग्नसोहळ्यात आला होता. तेव्हा त्याचा नवीन लूक पाहून हा 'टॉक्सिक' सिनेमातलाच लूक असल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. त्याच्या लूकची चांगलीच चर्चाही झाली.

'टॉक्सिक' मध्ये दिसणार ही बॉलिवूड अभिनेत्री

'टॉक्सिक' सिनेमात यशच्या दोन अभिनेत्री दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया दुसरी मुख्य अभिनेत्री असणार आहे. तर कियारा अडवाणी यशची पहिली लीड हिरोईन असणार आहे. नवीन प्रोजेक्टबद्दल दोघीही खूप एक्सायटेड आहेत. या सिनेमातून तारा कन्नड फिल्ममध्ये डेब्यू करणार आहे. ताराने हिंदीत 'हिरोपंती 2' आणि 'तडप' मध्ये काम केलं आहे. 

हा सिनेमा अॅक्शन थ्रिलर असणार आहे. गीतू मोहनदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढील वर्षी १० एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय यशचा 'केजीएफ 3'ही पाइपलाईनमध्ये आहे. यशला केजीएफ मुळेच संपूर्ण जगात ओळख मिळाली. केजीएफचा सीक्वेलही प्रचंड गाजला. आता चाहते तिसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. 

टॅग्स :यशतारा सुतारियाकियारा अडवाणीसिनेमाबॉलिवूड