Join us

तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! अरुणोदय सिंहसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:41 IST

आदर जैनसोबत ब्रेकअपनंतर तारा सुतारिया पुन्हा प्रेमात?

अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria)  बऱ्याच वर्षांपासून आदर जैनला डेट करत होती. आदर जैन रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. दोघं इव्हेंट्स, फॅमिली फंक्शन्समध्येही एकत्र दिसले होते. मात्र अचानक गेल्यावर्षी त्यांचं ब्रेकअप झालं. आता तारा सुतारिया अभिनेता अरुणोदय सिंहला (Arunoday Singh) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अरूणोदयचा याआधी घटस्फोट झाला आहे. 

'ईटाइम्स' रिपोर्टनुसार, तारा सुतारिया आणि अरुणोदय सिंह दीड वर्षांपासून सोबत आहे. दोघांही अनेकदा डेटला गेलेले दिसले आहेत. दोघांची आवडनिवडही एकच आहे. आर्ट संबंधी गोष्टी त्यांना आवडतात. एकमेकांसोबत ते बराच वेळही घालवतात. ताराच्या कुटुंबियांनाही अरुणोदय पसंत आहे. ताराला तिच्या गोष्टी खाजगी ठेवायला आवडतात आणि त्यांचा कोणीही पीआर नसल्याने त्यांच्या अफेअरची फारशी चर्चा झाली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना बांद्रा येथील एका हॉटेलमध्ये जाताना पाहिलं गेलं होतं. 

कोण आहे अरुणोदय सिंह?

अरुणोदय सिंहने 'जिस्म 2','मै तेरा हिरो','ये साली जिंदगी' या सिनेमांमध्ये काम केलं. 2016 मध्ये त्याने ली एन एल्टनसोबत लग्न केलं होतं. तर 2019 साली त्यांचा घटस्फोट झाला होता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचा तो नातू आहे. 

टॅग्स :तारा सुतारियाबॉलिवूडरिलेशनशिप