Join us

"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:18 IST

भूमिकेबद्दल काय म्हणाला सनी देओल?

नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) सिनेमाची बऱ्याच वर्षांपासून चर्चा आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. सिनेमात सनी देओल (Sunny Deol) हनुमानाची भूमिका करणार अशी चर्चा होती. मात्र त्यावर कोणीच अधिकृत माहिती दिली नव्हती. आता सनी देओलने स्वत:च 'रामायण' सिनेमातील भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच त्याने यावर भाष्य केलं आहे.

सनी देओलने नुकतीच न्यूज १८ च्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने अनेक विषयांवर संवाद साधला. तेव्हाच त्याने 'रामायण' सिनेमावरही भाष्य केलं आणि त्याच्या भूमिकेचा खुलासा केला. तू देवाला मानतोस का? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर सनी देओल म्हणाला,"हो मी रामायण मध्ये हनुमानाची भूमिका साकारत आहे. आणि देवाला कोण मानत नाही? आपण सगळेच त्याच्या कृपेमुळेच आहोत."

'रामायण'मधल्या भूमिकेबद्दल काय सांगशील? हनुमानाची भूमिका साकारणं आव्हानात्मक आहे का? यावर तो म्हणाला,"आम्ही कलाकारांना आव्हानात्मक गोष्टीच आवडतात. त्यातच खरी मजा असते. भूमिका योग्य प्रकारे साकारणं आणि दिग्दर्शकाचं ऐकणं आमच्या हातात असतं. मी भूमिकेत स्वत:ला झोकून देऊन काम करतो. म्हणजे प्रेक्षकांचा त्यावर विश्वास बसेल. अजूनपर्यंत मी सिनेमाचं चित्रीकरण सुरु केलेलं नाही पण हा सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे हे नक्की."

सनी देओलचा आता 'जाट' सिनेमा येणार आहे. साऊथ दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रणदीप हुड्डाचीही यात भूमिका आहे. 

टॅग्स :सनी देओलरामायणरणबीर कपूरसाई पल्लवीबॉलिवूड