Join us

कार्तिक आर्यनच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसली 'ही' अभिनेत्री, अफेअरच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:35 IST

'या' साऊथ ब्युटीला डेट करतोय कार्तिक आर्यन?

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. कार्तिक म्हणजे अनेक तरुणींचा क्रश आहे. 'मम्माज बॉय' कार्तिकच्या चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सुरुवातीला स्ट्रगल केल्यानंतर आता कार्तिक इंडस्ट्रीत स्थिरावला आहे. तरी त्याच्या साधेपणाचं नेहमीच कौतुक झालं आहे. कार्तिक काही वर्षांपूर्वी सारा अली खानला डेट करत होता. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. पण आता एक अभिनेत्री नुकतीच त्याच्या फॅमिली फंक्शनमध्ये डान्स करताना दिसली. यावरुन दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारी मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबाने छोट्या फंक्शनचं आयोजन केलं होतं. यावेळी कार्तिकसोबत चक्क अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) दिसली. श्रीलीला दाक्षिणात्य अभिनेत्री असून ती आणि कार्तिक आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सिनेमाचं रोमँटिक टीझरही काही दिवसांपूर्वी आलं होतं  ज्यात दोघांची सिझलिंग केमिस्ट्री दिसली. कार्तिकच्या फॅमिली फंक्शनमध्ये श्रीलीला डान्स करत असतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'दमादम मस्त कलंदर' या गाण्यावर सगळे नाचत आहेत. तर कार्तिक व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसतोय. यावेळी मध्येच श्रीलीला लपतानाही दिसते. हे पाहून कार्तिकही जोरजोरात हसायला लागतो. 

Sreeleela at kartik aaryan's sister celebrationbyu/Medium_Bicycle_1004 inBollyBlindsNGossip

या व्हिडिओनंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'कार्तिकच्या आईला मुलगी पसंत आहे','कार्तिकला याआधी इतकं लाजताना हसताना पाहिलं नव्हतं','आशिक आपल्या आशिकीसोबत' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

श्रीलीलाचं नुकतंच 'पुष्पा २' सिनेमात 'किस्सीक'हे गाणं गाजलं. श्रीलीला स्वत: डॉक्टर असल्याचं बोललं जातं. तसंच ती कार्तिकच्या बहिणीची मैत्रीण आहे असाही एक अंदाज वर्तवला जात आहे. आता खरं नक्की काय हे लवकरच कळेल. दरम्यान कार्तिक आणि श्रीलीलाचा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडरिलेशनशिपपरिवार