Join us

प्लेयर नंबर ४५६ आणि बॉलिवूडचा किंग! शाहरुख खानसोबत सेल्फी घेऊन 'स्क्वीड गेम'चा कलाकार म्हणतो-

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:24 IST

'स्क्वीड गेम' फेम अभिनेत्याने शाहरुख खानसोबत सेल्फी पोस्ट करुन लिहिलेलं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे

जगप्रसिद्ध कोरियन सीरिज 'स्क्विड गेम' (Squid Game) फेम अभिनेता ली जंग जे (Lee Jung Jae) आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांची भेट झाली असून, ली जंग जेने सोशल मीडियावर शाहरुखसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. या दोन दिग्गजांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. ली जंगने शाहरुखसोबत फोटो पोस्ट करुन खास शब्दात त्याचं कौतुक केलं

रियाद येथील 'जॉय फोरम'मध्ये भेट

शाहरुख खान नुकतंच सौदी अरेबियातील रियाद येथे आयोजित करण्यात आलेल्या 'जॉय फोरम' (Joy Forum) या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. याच इव्हेंटमध्ये ली जंग जेदेखील उपस्थित होता. या दोघांची भेट होताच ली जंग जेने शाहरुखसोबत सेल्फी क्लिक केला आणि तो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.

हा सेल्फी शेअर करताना ली जंग जेने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आयकॉन शाहरुख खानला भेटण्याचा सन्मान मिळाला." या सेल्फीमध्ये दोघेही मोठ्या उत्साहाने हसत असल्याचं दिसत आहेत. फॅन्सना ही सेल्फी खूप आवडली असून, त्यांनी 'शतकातील सर्वात मोठा कोलॅब' (Biggest Collab of the Century) असं म्हणत दोघांचंही कौतुक केलं आहे.

एका युझरने कमेंटमध्ये लिहिले, "माझे दोन सर्वात आवडते कलाकार एकाच फ्रेममध्ये आहेत!" तर दुसऱ्याने या भेटीला 'दोन महान कलाकारांचे जबरदस्त कोलॅबोरेशन' असं म्हटलं आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिन्ही मोठे स्टार्स देखील या कार्यक्रमात उपस्थित होते, मात्र ली जंग जेसोबतची शाहरुखची ही सेल्फी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Squid Game's Lee Jung Jae selfies with Bollywood's Shah Rukh Khan!

Web Summary : Squid Game's Lee Jung Jae met Shah Rukh Khan at Riyadh's Joy Forum. He shared a selfie, praising the Bollywood icon. Fans celebrated the unexpected collaboration.
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडहॉलिवूडसौदी अरेबियासलमान खानआमिर अली