Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला कोरोनाची लागण; होम क्वारंटाइन झाल्यावर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 15:40 IST

Chiranjeevi: सध्या तो होम क्वारंटाइन असून त्याच्याच कोविडची किरकोळ लक्षण जाणवत आहेत. 

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला (chiranjeevi) कोरोनाची लागण झाली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चिरंजीवने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली. तसंच सध्या तो होम क्वारंटाइन असून त्याच्याच कोविडची किरकोळ लक्षण जाणवत आहेत. 

"प्रिय मित्रांनो, योग्य काळजी घेतल्यानंतरही काल किरकोळ लक्षण जाणवल्यानंतर माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी घरी आहे. आणि, गेल्या काही दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले त्यांनी सगळ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसंच पुन्हा एकदा मला त्याच जोशात पाहण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही", अशी पोस्ट चिरंजीवीने शेअर केली आहे.

दरम्यान, चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच अनेक कलाकारांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. चिरंजीवी यांना कोविड झाल्यामुळे त्याच्या आगामी आचार्य या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु, आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :चिरंजीवीसेलिब्रिटीसिनेमाTollywoodबॉलिवूड