Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इथे फक्त एकच नियम..'; अल्लू अर्जुनने लीक केला Pushpa 2 चा डायलॉग; तुम्ही ऐकला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 16:08 IST

Allu arjun: अतिउत्साहाच्या नादात त्याने या सिनेमातील एक डायलॉग लीक केला.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) याचा 'पुष्पा: द राइज' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमातील संवाद, अल्लू अर्जुनची स्टाइल, सिनेमाचं कथानक, त्यातील गाणी सारखं काही सुपरहिट ठरलं. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम पाहून लवकरच या सिनेमाचा दुसरा पार्ट 'पुष्पा 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र, अतिउत्साहाच्या नादात त्याने या सिनेमातील एक डायलॉग लीक केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अलिकडेच अल्लू अर्जुनने आनंद देवरकोंडा यांच्या 'बेबी' या सिनेमाच्या यशानंतर आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांनी अल्लू अर्जुन पाहिल्यानंतर  ‘पुष्पा २: द रुल’ वरुन चीअर अप करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं हे प्रेम पाहुन अल्लूदेखील मोठ्या उत्साहात आला. आणि, त्याने गडबडीमध्ये या सिनेमातला संवाद बोलून तो लीक केला.

काय आहे पुष्पा २ मधला तो डायलॉग?

“इथे फक्त एकच नियम चालेल… तो आहे पुष्पाचा नियम”, असा डायलॉग अल्लू अर्जुनच्या तोंडातून पटकन निघाला. आणि, प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला. सध्या अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर आता प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमापुष्पा