Join us

Video: नियंत्रण सुटलं अन् कार उलटली, साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा थोडक्यात वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:56 IST

52 वर्षीय अजित कुमार याही वयात एकापेक्षा एक जबरदस्त अॅक्शन सीन्स देतात.

साऊथ सुपरस्टार अजीत कुमार (Ajith Kumar) यांचा गेल्या वर्षी शूटिंगदरम्यान अपघात झाला होता. यातून ते थोडक्यात वाचले. आता ते एकदम फीट आहेत. मात्र या अपघाताचा अंगावर काटा आणणारा भयानक व्हिडिओ नुकता समोर आला आहे. अजित कुमार यांचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि एका क्षणात कार उलटते. तेव्हाच एअरबॅग्स उघडतात म्हणून त्यांचा जीव वाचतो. 

अजित कुमार यांना अॅक्शन सुपरस्टारही म्हटलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. 52 वर्षीय अजित कुमार याही वयात एकापेक्षा एक जबरदस्त अॅक्शन सीन्स देतात. बॉडी डबलचा वापर न करतात ते स्वत: सीन्स करण्याला प्राधान्य देतात. गेल्या वर्षी त्यांचा शूटिंगदरम्यानच मोठा अपघात झाला होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. वाळवंटात त्यांचं शूट सुरु होतं. अजीत कुमार वेगाने कार चालवताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला आणखी एक टीममधील अभिनेता आहे. सुरुवातीला अभिनेता अभिनयच करताना दिसतो पण अचानक गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि कार उलटते. यानंतर सर्व क्रू मेंबर्स त्यांच्या दिशेला धावतात. दोघांनाही गाडीतून बाहेर काढलं जातं. गाडी उलटण्यावेळी एअरबॅग्स उघडल्या जातात म्हणूनच त्यांचा जीव वाचतो हेही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा भयानक व्हिडिओ अंगावर काटा आणणाराच आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा हा अपघात झाला होता. 'विदा मुयारची' सिनेमाचं ते शूट करत होते. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिले, 'कृपया अशी जोखीम घेऊन का','देवा, अशी जोखिम नका घेऊ थाला'. अजित कुमारच्या चाहत्यांनी त्यांना अशी रिस्क न घेण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodअपघातसिनेमा