Mohanlal’s Mother Santhakumari Death: मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांच्या आई शांताकुमारी (Santhakumari) यांचे आज मंगळवारी (३० डिसेंबर २०२५) दुपारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. कोचीतील एलमक्कारा येथील मोहनलाल यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी स्ट्रोक आल्याने त्या आजारी होत्या. त्यांना शेवटच्या काळात बोलायलाही त्रास व्हायचा.
शांताकुमारी या मोहनलाल यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान होत्या. आपल्या यशाचे सर्व श्रेय मोहनलाल नेहमीच आपल्या आईला देत असत. मोहनलाल आपल्या आईच्या खूप जवळ होते आणि त्यांच्या प्रकृतीची ते स्वतः काळजी घेत असत. आईच्या निधनामुळे मोहनलाल आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शांताकुमारी या दिवंगत विश्वनाथन नायर यांच्या पत्नी होत्या. शांताकुमारी यांचा मोठा मुलगा अर्थात मोहनलाल यांचा मोठा भाऊ प्यारेलाल यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. सुपरस्टार मोहनलाल हा त्यांचा धाकटा मुलगा आहे.
शांताकुमारी यांच्या निधनाची बातमी समजताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मल्याळम सुपरस्टार ममूटी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेट देऊन मोहनलाल यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. शांताकुमारी यांच्या पार्थिवावर ३१ डिसेंबर रोजी कोची येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Web Summary : Malayalam actor Mohanlal's mother, Shanta Kumari, died at 90 in Kochi due to age-related ailments. She was a major inspiration to Mohanlal. Her funeral will be held on December 31. Many film personalities offered condolences.
Web Summary : मलयालम अभिनेता मोहनलाल की मां शांता कुमारी का कोच्चि में 90 वर्ष की आयु में निधन हो गया। वह मोहनलाल के लिए एक बड़ी प्रेरणा थीं। उनका अंतिम संस्कार 31 दिसंबर को किया जाएगा। कई फिल्मी हस्तियों ने शोक व्यक्त किया।