अभिनेते नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाले. दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार दोघांचं लग्नसोहळा पार पडला. शोभिता धुलिपालासोबत नागा चैतन्य याच हे दुसरं लग्न आहे. यापुर्वी त्याने समंथा रुथ प्रभू हिच्याशी लग्न केलं होतं. पण, काही काळानंतर दोघे विभक्त झाले. पण, नाग चैतन्य याच्याआधी शोभिता धुलिपालानं कुणाला डेट केलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट आणि त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं. परंतु दोघांचे नाते चार वर्षे टिकू शकले. ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्याने शोभिता धुलिपालाला जीवनसाथी म्हणून निवडलं. शोभिता आणि नागा 2021 पासून डेट करत होते. नागा चैतन्यच्या आधी अभिनेत्रीचे नाव एका फॅशन डिझायनरशी जोडले गेले होते. नागाचैतन्यला डेट करण्याआधी शोभिता फॅशन डिझायनर प्रणव मिश्राला डेट करत होती. मात्र, दोघांमधील प्रेम फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.
शोभिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंचं झालं तर ती अखेरची 'लव्ह सितारा' या चित्रपटात दिसली होती. आगामी 2025 मध्येही तिचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शोभिताने २०१३ साली मिस अर्थ स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं होतं. शोभिताला 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजमध्येही ती प्रमुख भूमिकेत दिसली होती.