२०२२ साली एक असा सिनेमा आला ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. सिनेमाची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या सिनेमात एका साऊथ सुपरस्टारने काम केलं. याशिवाय एक मराठी अभिनेत्री यात झळकली. आता ४ वर्षांनी या सिनेमाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोनही प्रमुख कलाकारांनी त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्या सिनेमाचा दुसरा भाग येईल अशी चर्चा आहे त्याचं नाव आहे 'सीता रामम'.
'सीता रामम' हा सिनेमा २०२२ साली आला होता. या सिनेमात डुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. डुलकर आणि मृणालचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही एका छत्रीत असून एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांसोबत हसताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. या जोडीला पुन्हा एकदा फ्रेममध्ये एकत्र पाहून चाहत्यांना त्यांच्या आवडत्या 'राम' आणि 'सीता'ची आठवण झाली.
हा फोटो व्हायरल होताच कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला असून "आम्हाला या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायचे आहे," अशी मागणी चाहते करत आहेत. मृणाल आणि डुलकरच्या या भेटीमुळे 'सीता रामम २' (Sita Ramam 2) च्या चर्चांना उधाण आले आहे. जरी पहिल्या भागाचा शेवट अतिशय भावुक आणि पूर्ण झाला असला, तरी चाहत्यांना ही जोडी एखाद्या नवीन प्रेमकथेत किंवा 'सीता रामम'च्या सिक्वलमध्ये पाहायची इच्छा आहे. आता डुलकर आणि मृणालच्या या फोटोमागचं रहस्य काय, हे काहीच दिवसांत उलगडेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
Web Summary : Hit film 'Seetha Ramam' might have a sequel. Dulquer Salmaan and Mrunal Thakur's recent photo sparked speculation. Fans eagerly anticipate their reunion on screen, hoping for a new love story or a continuation of 'Seetha Ramam'.
Web Summary : हिट फिल्म 'सीता रामम' का सीक्वल आ सकता है। दुलकर सलमान और मृणाल ठाकुर की हालिया तस्वीर ने अटकलों को जन्म दिया। प्रशंसक उनकी ऑन-स्क्रीन पुनर्मिलन का बेसब्री से इंतजार कर रहे हैं, एक नई प्रेम कहानी या 'सीता रामम' की निरंतरता की उम्मीद कर रहे हैं।