Join us

दोघांचंही सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? धनुष-ऐश्वर्याबाबतीत गायिका सुचित्राचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 12:15 IST

धनुषच नाही तर ऐश्वर्यानेही दिलाय धोका?

दाक्षिणात्या सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार धनुष (Dhanush)आणि पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth) यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांचा संसार मोडत ते वेगळे झाले. त्यांना दोन मुलं आहेत. या स्टार कपलच्या घटस्फोटाबद्दल गायिका सुचित्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते दोघंही एकमेकांना धोका देत होते असं तिने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुचित्रा एका मुलाखतीत म्हणाल्या, "ते दोघंही एकमेकांचा विश्वासघात करत होते. दोघंही वेगवेगळ्या लोकांसोबत डेटवर जायचे. धनुषने ऐश्वर्याला धोका दिला आहे तसंच ऐश्वर्यानेही धनुषला धोका दिला आहे. ऐश्वर्या धनुषवर आरोप करते पण तिनेही तेच केलं आहे. हे डबल स्टँडर्ड नाही का? माझ्याकडे त्यांच्याविषयी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आहे. ते दोघं आपापल्या डेटसोबत एकत्र बारमध्येही बसले आहेत. विवाहित असताना असं दुसऱ्याबरोबर डेटवर जाणं योग्य आहे का?"

रजनीकांत यांचा उल्लेख करत सुचित्रा म्हणाल्या, "धनुष खूप चांगला पिता आहे. पण मला आशा आहे की धनुष आणि ऐश्वर्याची मुलं त्यांच्या आजोबांबरोबर राहावीत." त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. एक १८ वर्षांचा तर दुसरा मुलगा १४ वर्षांचा आहे. 

ऐश्वर्या आणि धनुष यांचा घटस्फोट दाक्षिणात्य इंड्स्ट्रीतील सर्वात चर्चेतला घटस्फोट होता. सुचित्रा यांच्या या धक्कादायक खुलाश्यानंतर ऐश्वर्या-धनुष यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :धनुषTollywoodलग्नघटस्फोट