Join us

वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:27 IST

दसऱ्याच्या शुभदिनी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे

आज दसऱ्याच्या आनंदाच्या दिवशी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या पतीपासून घटस्फोट घेणार आहे. वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अभिनेत्रीने ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रोश्ना ॲन रॉय (Roshna Ann Roy) आणि अभिनेता किचू टेलस (Kichu Tellus) यांनी ५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. रोश्नाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या विभक्त होण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

लग्नााच्या ५ वर्षांनंतर घटस्फोट

अभिनेत्री रोश्नाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून ती पतीपासून घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं आहे. कोची येथे २०२० मध्ये या दोघांनी मोठ्या थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं होतं. रोश्ना म्हणाली, "आम्ही ५ वर्षे एकत्र घालवल्यानंतर आता प्रेम आणि आदराने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या आठवणींसाठी कृतज्ञ आहोत. जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात करताना आम्हाला तुमच्या प्रार्थनांची अपेक्षा आहे. याशिवाय तुम्ही आमच्या गोपनीयतेचा (privacy) आदर करावा, अशी विनंती मी करत आहे."

रोश्ना पुढे म्हणाली, "हे सार्वजनिक व्यासपीठावर सांगणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. आम्हा दोघांनाही वेगवेगळ्या मार्गांनी शांततेत जगण्याचा हक्क आहे. काही लोकांना या बातमीने आनंद होईल आणि त्यांचा आनंद कायम राहो, अशी मी प्रार्थना करते. आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि आजही अनेक बाबतीत मित्र आहोत. किचू आणि मी, जे कधी एकत्र होतो, आता वेगळे झालो आहोत. असो, जीवन पुढे जात राहते."

रोश्नाने घटस्फोटाचे नेमकं कारण स्पष्ट केलं नाही. तिने भावनिक पोस्टमध्ये शेवटी लिहिलं की, "३० सप्टेंबर - ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना गमावलं, माझ्या आयुष्यातील पहिलं दुःख. आणि आज, मी आणखी एक शेवट करत आहे आणि पुढे पाऊल टाकत आहे. एका दुःखातून दुसऱ्या दुःखाकडे जाताना मी उठून उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress announces divorce on father's death anniversary after 5 years.

Web Summary : Actress Roshna Ann Roy and Kichu Tellus are divorcing after five years of marriage. Roshna shared a heartfelt post announcing their separation, requesting privacy. She noted the day coincided with her father's death anniversary, marking a painful new chapter as she moves forward.
टॅग्स :घटस्फोटलग्नबॉलिवूडTollywood