साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, या लग्नानंतर एका वेगळ्याच गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ती म्हणजे या दोन्ही स्टार्सची खरी नावे. आपण ज्या नावाने त्यांना ओळखतो, ती त्यांची पडद्यावरची नावे असून त्यांची खरी नावे काहीतरी वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
काय आहे 'पुष्पा' गर्लचं खरं नाव?
अनेकांना वाटते की 'रश्मिका मंदाना' हेच अभिनेत्रीचे पूर्ण नाव आहे. मात्र, कर्नाटकातील कूर्गमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीचे नाव कागदोपत्री काहीसे वेगळे आहे. अनेकदा साऊथच्या नावांमध्ये त्यांच्या गावाचे किंवा वडिलांच्या नावाचे संक्षिप्त रूप असते. रश्मिकाचं पूर्ण नाव 'मुंडाचदिरा रश्मिका मंदाना' असं आहे. रश्मिका सिनेमात पूर्ण नाव न लावत नाही.
दुसरीकडे, आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या विजय देवरकोंडाच्या नावाबाबतही अशीच माहिती समोर आली आहे. विजयचे पूर्ण नाव 'देवरकोंडा विजय साई' (Deverakonda Vijay Sai) असे आहे. चित्रपटसृष्टीत येताना त्याने केवळ 'विजय देवरकोंडा' या नावाने ओळख मिळवली. त्यामुळेच एकूणच लग्नाच्या विधीवेळी आणि पत्रिकेवर या दोघांचंही पूर्ण नाव समोर आल्याने चाहत्यांमध्ये कुतुहल निर्माण झाले
लवकरच 'ग्रँड रिसेप्शन'
उदयपूरमध्ये दाक्षिणात्य परंपरेनुसार लग्न आटोपल्यानंतर आता हे जोडपे हैदराबादला रवाना झाले आहे. ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून, तिथे सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या धामधुमीत समोर आलेल्या या 'नेम फॅक्ट्स'मुळे 'विरोश'च्या चाहत्यांसाठी ही एक रंजक अपडेट ठरली आहे.
Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's wedding sparked curiosity about their real names. Rashmika's full name is 'Mundachadira Rashmika Mandanna,' while Vijay's is 'Deverakonda Vijay Sai'. A grand reception is planned in Hyderabad.
Web Summary : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा की शादी के बाद उनके असली नामों को लेकर उत्सुकता पैदा हुई। रश्मिका का पूरा नाम 'मुंडाचदिरा रश्मिका मंदाना' है, जबकि विजय का 'देवरकोंडा विजय साई' है। हैदराबाद में एक भव्य रिसेप्शन की योजना है।