Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नाने मोडलाय एक खास 'रेकॉर्ड'; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:41 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरात रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या लग्नात एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरात रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या लग्नात एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर येताच लाईक्सचा पाऊस पडला. अवघ्या २४ तासांच्या आत या जोडप्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा इन्स्टाग्रामवरील सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

कोहलीचा वर्ल्ड कप विजयाचा रेकॉर्ड मोडला२०२४ मध्ये भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोला जवळपास २२.८ मिलियन लाईक्स मिळाले होते, जो आतापर्यंतचा भारतातील सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो होता. मात्र, रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या पोस्टने हा आकडा पार केला. रश्मिकाच्या वैयक्तिक पोस्टला २३ मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, तर विजय देवरकोंडाच्या पोस्टलाही १८ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या दोघांच्या पोस्ट लाईक्सचे आकडे एकत्र केले तर, दोघांच्या पोस्टला मिळून ४० मिलियनहून अधिक लाईक्स आहेत. 

बॉलिवूड कपल्सलाही टाकले मागे'विरोश'च्या (Virosh) या लग्नाच्या फोटोंनी बॉलिवूडमधील सर्व मोठ्या लग्नांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. यापूर्वी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या फोटोंना १५.८ मिलियन लाईक्स मिळाले होते. तसेच आलिया-रणबीर (१४ मिलियन) आणि कतरिना-विकी (१२.६ मिलियन) यांसारख्या लोकप्रिय जोड्यांनाही रश्मिका आणि विजयने  मागे टाकले आहे. एकूणच रश्मिका-विजयवर चाहते किती प्रेम करतात, हेच यावरुन पाहायला मिळतं. 

सध्या रश्मिका-विजय हे जोडपे हैदराबादला रवाना झाले आहे. ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी या दोघांनी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले आहे. या विक्रमी लाईक्समुळे रश्मिका आणि विजयची लोकप्रियता सध्या शिखरावर असल्याचे सिद्ध झाले असून, 'विरोश' ही जोडी खऱ्या अर्थाने डिजिटल विश्वाची 'किंग' आणि 'क्विन' ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's Wedding Breaks Instagram Record

Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's wedding photos broke Virat Kohli's Instagram record. Their posts garnered over 40 million likes, surpassing Bollywood couples like Kiara-Sidharth and Alia-Ranbir. A Hyderabad reception is planned.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाबॉलिवूडTollywoodसेलिब्रेटी वेडिंगलग्न