Join us

रश्मिका मंदानाने १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:24 IST

रश्मिका मंदानाचे ८ वर्षांपूर्वीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सुपरस्टारसोबत साखरपुडा करुनही रश्मिकाचं लग्न का मोडलं?

साउथ इंडस्ट्रीसह सध्या बॉलिवूडही गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिका सध्या विविध सिनेमांमध्ये काम करत असून सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. रश्मिका सध्या साउथ सुपरस्टार विजय देवराकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चा असतानाच रश्मिकाचे ८ वर्षांपूर्वीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो रश्मिकाच्या साखरपुड्याचे आहेत. रश्मिका वयाच्या २१ व्या वर्षीच एका सुपरस्टारशी साखरपुडा करणार होती. पुढे काय झालं?

...तर रश्मिकाचा २२ व्या वर्षीच झाला असता साखरपुडा

काही मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका सुपरस्टार अभिनेता, दिग्दर्शक रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. रश्मिका आणि रक्षितच्या नात्यात १३ वर्षांचं अंतर होतं. इतकंच नव्हे रश्मिका आणि रक्षितने साखरपुडा देखील केला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही समोर आले होते. २०१६ मध्ये रश्मिकाने 'किरिक पार्टी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिची आणि रक्षितची जोडी जमली होती. इथूनच दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. त्यामुळेच २०१७ साली रश्मिका-रक्षितने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न का मोडलं?

रश्मिकाने वयाच्या २१ व्या वर्षी रक्षितसोबत साखरपुडा तर केला परंतु साखरपुडा झाल्यानंतर मात्र दोघांमध्ये बरेच मतभेद झाले. दोघांचे भविष्याविषयीचे वेगळे विचार आणि कुटुंबीयांचा विरोध यामुळे त्यांनी वेगवेगळ्या वाटा पत्करल्या, अशी चर्चा झाली. त्यामुळे साखरपुड्यानंतर रश्मिका-रक्षितचं ठरलेलं लग्न मोडलं. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याचा आदर राखत पुढे कधीही या विषयावर भाष्य केलं नाही. किंवा एकमेकांवर टीका केली नाही. सध्या दोघेही करिअरमध्ये शिखरावर आहेत. आता ८ वर्षांनी दोघांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्याने पुन्हा त्यांच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. 

टॅग्स :रश्मिका मंदानालग्नTollywoodबॉलिवूडघटस्फोट