Join us

Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:27 IST

'पुष्पा २'च्या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'पुष्पा २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या 'पुष्पा २' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'पुष्पा २' सिनेमासाठी अवघे काहीच दिवस प्रेक्षकांना आता वाट पाहावी लागणार आहे. सिनेमाचं पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर 'पुष्पा २'च्या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'पुष्पा २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

आधीच घोषणा करण्यात आल्याप्रमाणे रविवारी(१७ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'पुष्पा २' सिनेमाचा २ मिनिटे ४० सेकंदाचा ट्रेलर खिळवून ठेवणारा आहे. धमाकेदार अॅक्शनसह अल्लू अर्जुनचा रुद्रावतार या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. पुष्पा आणि श्रीवल्लीच्या रोमान्ससह थ्रिलरही 'पुष्पा २'मध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पुष्पाची चंदनची तस्करी आता इंटरनॅशनल स्तरावर पोहोचल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. "पुष्पा नाम नही ब्रँड है",  "श्रीवल्ली मेरी बायको है, पत्नी बायको की सुने तो मुरे दुनिया को हिलाऐगा" असे डायलॉग लक्ष वेधून घेत आहेत. मै हू डॉन या गाण्यावर 'पुष्पा २'मधील भवर सिंहची ट्रेलरमध्ये एन्ट्री होत असल्याचं दिसत आहे. फहाद फासिल या सिनेमात इन्स्पेक्टर भंवर सिंहच्या भूमिकेत आहे. 

२०२१ मध्ये पुष्पा : द राइज हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. तेव्हापासूनच 'पुष्पा २'ची चाहते वाट बघत होते.  आधी हा सिनेमा या वर्षी स्वातंत्र्यदिनाला रिलीज होणार होता. परंतु अनेकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर 'आता हा सिनेमा ५ डिसेंबरला रिलीज होत आहे. त्यामुळे २०२४ च्या अखेरीस 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदानासिनेमाTollywood