Join us

'कांतारा चाप्टर १'साठी कोणाला किती मानधन मिळालं? ऋषभ शेट्टीने साधला मोठा डाव, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:39 IST

'कांतारा चाप्टर १'च्या कलाकारांनी घेतलेलं मानधन बघून तुम्ही थक्कच व्हाल, जाणून घ्या

साऊथ सिनेमातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा' च्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षक या सिनेमाचा प्रीक्वल अर्थात 'कांतारा चॅप्टर १'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाचं बजेट सुमारे १२५ कोटी रुपये आहे, जे पहिल्या भागापेक्षा जवळपास चार पटीने अधिक आहे. चित्रपटाचं बजेट एवढं महाग आहे तर कलाकारांचं मानधन सुद्धा तगडं आहे. जाणून घ्या 'कांतारा चॅप्टर १'च्या कलाकारांच्या मानधनाबद्दल

मुख्य कलाकारांची फी किती?

 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाचा मुख्य अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक असलेला ऋषभ शेट्टी ठराविक मानधन न घेता चित्रपटाच्या नफ्यातील वाटा घेणार आहे. म्हणजेच, चित्रपट एकूण जी कमाई करेल, त्यातील ठराविक टक्केवारी ऋषभ शेट्टीला मिळेल. त्याने चित्रपटाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी खर्चाची मर्यादा न ठेवता शूटिंगवर जास्त पैसे खर्च केले आहेत. चित्रपटाचे ओटीटी हक्क विक्रमी किंमतीत विकले गेल्याने, निर्मात्यांना प्रदर्शनापूर्वीच चांगला नफा झाला आहे. हा चित्रपट जगभरात ७००० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

इतर कलाकारांना मिळालेले मानधन

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटातील अन्य प्रमुख कलाकारांना मिळालेल्या मानधनाचे आकडे खालीलप्रमाणे आहेत:

  • सप्तमी गौडा: यांना २ कोटी मानधन मिळाल्याची चर्चा आहे.

  • रुक्मिणी वसंत: यांना १ कोटी फी देण्यात आली आहे. रुक्मिणी या चित्रपटात ऋषभसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

  • गुलशन देवैया: ट्रेलरमध्ये दमदार दिसलेल्या गुलशन देवैयाला १ कोटी मानधन मिळालं आहे.

  • जयराम: अन्य प्रमुख कलाकारांपैकी जयराम यांनाही १ कोटी फी मिळाल्याचे वृत्त आहे.

'कांतारा चॅप्टर १' च्या या भव्य तयारीवरून, कन्नड चित्रपटसृष्टी यंदा मोठा बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे, हे स्पष्ट होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kantara Chapter 1: Who got how much? Rishab Shetty's big move.

Web Summary : Kantara Chapter 1's budget is ₹125 crore. Rishab Shetty takes profit share. Other actors' fees: Saptami Gowda (₹2 crore), Rukmini Vasanth, Gulshan Devaiah, and Jayaram (₹1 crore each).
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबॉक्स ऑफिस कलेक्शन