Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दारुच्या नशेत वाहनांना दिली धडक; अभिनेता मयुरविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:38 IST

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून अनेक वाहनांना धडक दिल्याप्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता मयुर पटेल (Mayur Patel) कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून अनेक वाहनांना धडक दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा बंगळुरूमध्ये हा अपघात घडला, ज्यामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकी घटना काय?

मीडिया रिपोर्टनुसार, मयुर पटेल आपली टोयोटा फॉर्च्युनर कार डोमळूर परिसरातून अत्यंत वेगाने चालवत होता. नशेत असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात एका सरकारी वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनांचे नुकसान पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मयुर पटेलला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा कितीतरी पट अधिक असल्याचे उघडकीस आले आहे.

कोण आहे मयूर पटेल?

मयूर पटेल हा ज्येष्ठ कन्नड अभिनेता मदन पटेल यांचा मुलगा आहे. त्याने २००० मध्ये 'आंध्रा हेंड्थी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००३ मध्ये आलेल्या 'मणी' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय त्याने 'गुन्ना' आणि 'स्लम' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र या प्रकरणामुळे त्याची प्रतिमा मलिन झाली असून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.

बंगळुरू पोलिसांनी मयुर पटेलच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंग आणि ड्रंक अँड ड्राइव्ह कलमान्वये एफआयआर (FIR) दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मयुरची गाडी जप्त करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Mayur Patel arrested for drunk driving, hitting vehicles.

Web Summary : Kannada actor Mayur Patel was arrested in Bengaluru for drunk driving after hitting several vehicles. No injuries were reported, but significant vehicle damage occurred. Patel's blood alcohol level exceeded legal limits.
टॅग्स :बॉलिवूडTollywoodड्रंक अँड ड्राइव्हटेलिव्हिजनटिव्ही कलाकार