दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा विवाहसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर अद्याप त्यांच्याच फोटोंची चर्चा आहे. अशातच, या जोडीच्या एक चिमुकल्या चाहतीने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. "तुमच्या लग्नाचं आमंत्रण मला का मिळालं नाही?" असा सवाल करणाऱ्या या चिमुकलीला रश्मिका आणि विजयने अतिशय गोड उत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक लहान मुलगी रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून रडताना आणि तक्रार करताना दिसत होता. "तुम्ही मला लग्नाला का बोलावलं नाही? मी तुमची चाहती नाही का? माझं काय?" असं ही चिमुकली म्हणताना दिसते. आपल्या लाडक्या जोडीच्या आयुष्यातील इतक्या मोठ्या सोहळ्यात आपल्याला स्थान न मिळाल्याने या मुलीने निरागस तक्रार केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
हा व्हिडिओ जेव्हा रश्मिका-विजयपर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्या मुलीला प्रेमाने उत्तर दिले. रश्मिकाने हा व्हिडीओ शेअर करत त्या मुलीला स्पेशल गिफ्ट देण्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडे विजय म्हणाला, ''मी तुला घरी जेवायला बोलवेन. तुझे आवडते पदार्थ आणि मिठाई सांग. मी ती घरी बनवतो, मग आपण आनंदात खाऊ.'', अशाप्रकारे रश्मिका-विजयने त्या लहान मुलीला रिप्लाय दिला. एकूणच रश्मिका-विजयने त्यांच्या उत्तराने त्या चिमुकलीचं मन जिंकलं.
Web Summary : A little fan was upset for not being invited to Rashmika and Vijay's wedding. Rashmika promised a gift, and Vijay offered a home-cooked meal to cheer her up.
Web Summary : रश्मिका और विजय की शादी में आमंत्रित नहीं किए जाने पर एक छोटी प्रशंसक परेशान थी। रश्मिका ने उपहार का वादा किया, और विजय ने उसे खुश करने के लिए घर का बना खाना पेश किया।