Join us
Daily Top 2Weekly Top 5

पापाराझींवर संतापली श्रुती हासन, 'मम्मा' म्हणताच अभिनेत्रीचा झाला तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:15 IST

Shruti haasan: श्रुतीचा हा व्हिडीओ X वर शेअर करण्यात आला आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यामध्येच आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींवर प्रचंड संतापल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर तिने कॅमेरासमोर सगळ्या पापाराझींना खडेबोलदेखील सुनावले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्रुतीला नुकतंच मुंबईत स्पॉट करण्यात आलं. एका रेस्टॉरंटमधून ती बाहेर पडत होती. श्रुतीला पाहताच पापाराझींचे कॅमेरा ऑन झाले. यावेळी एका पापाराझीने पटकन तिला 'मम्मा' अशी हाक मारली. ज्यामुळे ती प्रचंड संतापली. श्रुतीचा हा व्हिडीओ X वर शेअर करण्यात आला आहे.

श्रुतीने विचारलं कोण 'मम्मा'?

पापाराझीने श्रुतीला मम्मा म्हणताच तिने उलटप्रश्न केला. ''कोण मम्मा? तुझी मम्मा का?काय बडबड करतोय तू?'' असं म्हणत श्रुतीने तिचा राग व्यक्त केला. श्रुती ज्या पद्धतीने व्यक्त झाली त्याच्यावरुन तिला प्रचंड राग आल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

दरम्यान, श्रुती लवकरच 'आकासमलो ओका तारा' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दुलकर सलमान आणि सात्विका वीरवल्ली स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच ती 'सालार: पार्ट 2' मध्येही दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shruti Haasan angered by paparazzi calling her 'momma'.

Web Summary : Shruti Haasan recently snapped at paparazzi in Mumbai. She was angered when one of them called her 'momma' outside a restaurant, questioning their familiarity and scolding them for the inappropriate term. The actress will soon appear in 'Aakasamlo Oka Tara' and 'Salaar: Part 2'.
टॅग्स :श्रुती हसनसेलिब्रिटीसिनेमाTollywoodबॉलिवूड